राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे इमारतीचे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे इमारतीचे उद्घाटन

*कोकण Express*

*राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे इमारतीचे उद्घाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे इमारतीचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ११.५५ वाजता कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आ.नितेश राणे,मुबंई विद्यापीठ कुलगुरु प्रा.सुहास पेडणेकर,मुबंई विद्यापीठ प्र.कुलगुरु प्रा.रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील,के.मंजुलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कॉलेज परिसरात पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात आली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.याठिकाणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने तहसीलदार आर.जे. पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदींसह अधिकारी उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!