*कोकण Express*
*कंटेनरची मॅक्स पिकअपला जोरदार धडक…!*
*मॅक्स पिकअप मधील दोघेजण गंभीर जखमी …!*
*हळवल फाटका नजिक पुन्हा अपघात…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दुपारी महामार्गावर वागदेत भीषण अपघात घडल्यानंतर क्रुझर चालक जागीच ठार झाल्याची घडल्याची घटना ताजी असताना पुन्हा त्याच ठिकाणी आज रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मोठा अपघात झाला. या अपघातात कंटेनर ने मॅक्स पिकअपला धडक दिली. यात मॅक्स पिकअप मधील दोघेजण गंभीर जखमी झाले. एकाच लेन वरून दोन्ही बाजूची वाहने जात असल्याने हा अपघात घडला. अपघातात जखमींना वागदे ग्रामस्थांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान फ्लावर ब्रिजवरून आलेल्या मॅक्स पिकअप तर घेत असताना कंटेनर ची धडक बसल्याचे सांगितले जाते. वारंवार या ठिकाणी अपघात होत असताना देखील कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात देखील यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.