वैभववाडी तालुक्यातील इतर जिल्हा मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी झाडी व रस्ता दुरूस्ती गणेश उत्सवा पूर्वी मार्गी लावा- मंगेश लोके

वैभववाडी तालुक्यातील इतर जिल्हा मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी झाडी व रस्ता दुरूस्ती गणेश उत्सवा पूर्वी मार्गी लावा- मंगेश लोके

*कोकण Express*

*वैभववाडी तालुक्यातील इतर जिल्हा मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी झाडी व रस्ता दुरूस्ती गणेश उत्सवा पूर्वी मार्गी लावा- मंगेश लोके*

वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुका ग्रामीण भाग असून त्या भागातील काही रस्ते दुचाकी व चारचाकी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसाठी पुर्ण पणे धोकादायक झाले आहे. सदर रस्ते नादुरुस्त झाल्या मुळे काही ठिकाणी एसटी वाहतूक सुद्धा बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
जिल्हा परीषद बांधकाम विभाग अंतर्गत तालुक्यामध्ये जे प्रमूख रस्ते आहेत त्या रस्त्यांवर पूर्णतः झाडी वाढलेली आहे. त्यामुळे समोर येणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांना समोरची वाहने दिसत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या खात्याच्या या दुर्लक्ष पणामुळे एखादा अपघात होऊन एखाद्याचा नाहक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उदा. तालुक्यातील रस्ते, सांगुळवाडी, सडूरे. इजिमा. क्र.10 , सांगुळवाडी नावळे इजीमा क्र.9, कुसुर नापणे कोकाटे वाडी , कूसुर – तिरवडे तर्फे खारेपाटन, कुसूर् उंबर्डे नायदे कातकरवाडी, लोरे – गडमठ, इत्यादी महत्वाच्या रस्त्यांची अग्रक्रमाने झाडी मारून दुरूस्ती होणे गरजेचे आहे. तसेच सांगुळवाडी,निमअरुळे, सडुरे हा रस्ता तर झाडीने पुर्ण झाकला आहे.
तरी वरील रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत विचार करून आपल्या जि प प्रशासनाकडून गणपती उत्सवा पूर्वी मार्गी लावाव्यात असे निवेदन जि. प .कार्यकारी अभियंता व उप अभियंता कणकवली यांना वैभववाडी शिवसेना तालुका प्रमूख श्री. मंगेश लोके यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!