हळवल फाटा येथे कंटेनरच्या धडकेत कार चालक जागीच ठार

हळवल फाटा येथे कंटेनरच्या धडकेत कार चालक जागीच ठार

*कोकण Express*

*हळवल फाटा येथे कंटेनरच्या धडकेत कार चालक जागीच ठार..!*

*वनवे मुळे बळी गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप..!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची समोरून येत असलेल्या क्रुझर चार चाकीला जोरदार धडक बसली. हा अपघात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघातात चालक प्रशांत प्रभाकर सावंत (४७, नरडवे व सध्या रा. कणकवली) यांचा जागीच मृत्यू झाला. जोपर्यंत वागदे येथील दुसरी बंद लेन सुरु करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुबंई गोवा महामार्गावर हळवल फाटा गडनदी पुलानजीकच्या वळणावर शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघाताची भीषणता मोठी आहे,समोरील क्रूझर गाडीचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे डोकीला गंभीर दुखापत होऊन चालक प्रशांत प्रभाकर सावंत (४७, नरडवे व सध्या रा. कणकवली) यांचा मृत्यू झाला.अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

या ठिकाणी गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत हायवेची एक लेन बंद आहे.त्यामुळे येणारी – जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात.या ठिकाणी जमीन मालकांना मोबदला न मिळाल्याने रस्त्याचे काम अडवले आहे.तरी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.

यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, विलास गावकर, बाबू सावंत, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!