*कोकण Express*
*गणेश चतुर्थी नियोजन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगराध्यक्षांकडून कारवाईच्या सूचना*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत ने गणेशोत्सव कालावधीचे नियोजन केल्यानंतर या संदर्भात दिलेल्या सूचनानुसार नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करा. कोणत्याही परिस्थितीत गणेश भक्तांना, चाकरमानी यांना त्रास होत नये. या दृष्टीने काळजी घ्या. अशा सूचना दिल्या. तसेच वर्षानुवर्षे गाड्या फ्लाय ओव्हर ब्रिज खाली पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करा. अशा सूचना यावेळी दिल्या. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, यांच्यासह नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने पार्किंग च्या नियोजनाबद्दल संघटनेचे कौतुक करण्यात आले.

