सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे 43वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे 43वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे 43वे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले*

*कासार्डे;संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे 43 वे वार्षिक स्नेहसंमेलन रावेत येथील आहेर गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांना कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. तसेच, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक अरविंद पालव, प्रमोद राणे, त्याचप्रमाणे सल्लागार अंकुशराव साईल, सिंधू लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन परशुराम उर्फ भाई प्रभू, मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, उपाध्यक्ष अरुण दळवी, सेक्रेटरी एडवोकेट चंद्रकांत गायकवाड, खजिनदार धर्मराज सावंत, कार्याध्यक्ष विश्वास राणे, सहखजिनदार चंद्रकांत साळस्कर, सह सेक्रेटरी प्रकाश साईल, नटसिंधूचे अध्यक्ष राजेश कांडर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळातील कलाकारांनी व मुलांनी विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी या कलाकारांचा सन्मान विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आला. या नंतर मंडळातील कलाकारांनी “शेरास सव्वाशेर” ही एकांकिका सादर केली. पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलीस इन्स्पेक्टर अविनाश शिंदे व नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी सुरेश वेंगुर्लेकर, यावेळी प्रकाश परब, भीवा परब, विष्णू भुते, अशोक मेजरी या मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांना कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. त्याबरोबर मंडळाची संलग्न राहून सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला-संस्थेला सिंधू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. देसाई कुटुंबांचे मंडळामधील योगदान तसेच सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यावेळी श्री व सौ प्रणिता पांडुरंग देसाई या उभयताना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांचा सन्मान कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शिवसेनेचे हरेश नखाते, सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे हे मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे मालवणी भाषेमधील सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले. अजय पाताडे यांनी  अध्यक्ष भाषणामध्ये संबोधित करताना दोन वर्षातनंतर सर्व कोकण वासिय एकत्र आल्याने आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर कोरोनाच्या मागील दोन वर्षाच्या काळामध्ये जी आपली जवळची  माणसं गेली त्यांच्याबद्दल दुःखही व्यक्त केले, कोरोनाच्या काळामध्ये माणसाने माणसाशी कस जगाव हे ही शिकवलं त्यामुळे जीवनामध्ये सर्वांशी हसत खेळत जीवनाचा आनंद घ्या तंदुरुस्त रहा, निरोगी आयुष्य जगा, कधी काही अडचण असेल तर मंडळ आपल्या सोबत आहे अश्या शुभेच्छा व्यक्त करत  निधन पावलेल्या व्यक्तीना श्रद्धांजली अर्पित करून शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, मंडळाचे सेक्रेटरी एडवोकेट चंद्रकांत गायकवाड यांनी सर्वांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!