वीज बिलात करांच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची लूट थांबवा – अबिद नाईक

वीज बिलात करांच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची लूट थांबवा – अबिद नाईक

*कोकण Express*

*वीज बिलात करांच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची लूट थांबवा – अबिद नाईक*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महावितरण कंपनीकडून विविध करांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट केली जात आहे. लाईट बिलापेक्षा इंधन समायोजन आकार, वहन आकार, विज शुल्क, स्थिर आकार या माध्यमातून ग्राहकांची लूट केली जाते. ही लुटमार त्वरित थांबविण्यात यावी. याबाबत महिन्याभरात कार्यवाहीचे लेखी उत्तर द्या, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरणला दिला आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबू सावंत, शहर अध्यक्ष इमरान शेख, उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस अनिस नाईक, सतीश पाताडे, राजू वर्दंम, दिलीप वर्णे, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, सचिन सदडेकर व इतरांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांना याबाबतचे निवेदन दिले.

महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे. राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत असून विविध जाचक करातून मुक्तता मिळण्यासाठी जनता धडपडत आहे. महावितरण कडून सर्वसामान्य ग्राहकांना अन्यायकारक बिले माथी मारून मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. सद्यस्थितीत वीज ग्राहकांना अन्य पर्याय नसल्याने ही अन्यायकारक बीले स्वीकारावी लागत आहेत. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळप्रसंगी ग्राहक रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे ही अन्यायकारक दर वाढ व विविध करांच्या माध्यमातून होणारी लुटमार त्वरित थांबवावी यासाठी हे निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी ग्रामीण भागातील विविध तक्रारी ही मांडण्यात आल्या. या तक्रारी गणेश चतुर्थी पूर्वी मार्गी लावण्याचे आश्वासन श्री भगत यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!