पाट विकास संस्थेच्या नूतन इमारत बांधकामाचे जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांचे हस्ते भूमिपूजन

पाट विकास संस्थेच्या नूतन इमारत बांधकामाचे जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांचे हस्ते भूमिपूजन

*कोकण Express*

*पाट विकास संस्थेच्या नूतन इमारत बांधकामाचे जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांचे हस्ते भूमिपूजन*

*सिंधुदुर्गनगरी  ः  प्रतिनिधी*

गेली ७५वर्षांनी पाट गावातील शेतक-यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.पाट विकास संस्थेची प्रशस्त अशी नुतन इमारत असावी हे स्वप्न साकार होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते पाट विविध सहकारी सेवा सो. पाट या संस्थेच्या नूतन इमारत बांधकामाचे भूमीपूजन चौथ्या श्रावण सोमवारी करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यास पाट गावचे विद्यमान सरपंच रिती राउळ, उपसरपंच प्रसाद राउळ, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू , माजी सभापती कुडाळ संजय वेंगुर्लेकर, एस. के. पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ पाटचे चेअरमन व माजी सरपंच समाधान परब, आंदुर्ले गावचे माजी सरपंच आरती पाटील, पाट विकास संस्थेचे चेअरमन संजय पाटकर, व्हा. चेअरमन पंढरिनाथ घारे, सचिव आकांशा धुरी, माजी चेअरमन पुंडलिक पेडणेकर, माजी सचिव गोपाळ पवार तसेच नुतन संस्था इमारतीसाठी ज्यांनी विनामुल्य जमिन दिली ते रमेश प्रभू, संस्था कमिटी सदस्य तसेच पाट गावातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे संस्था व ग्रामस्थांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मनिष दळवी यांनी संस्थेच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाट गावचे माजी सरपंच समाधान परब यांनी यावेळी पाट विकास संस्थेबाबत माहिती दिली. पाट विकास संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असुन गेल्या ४ वर्षापूर्वी आलेल्या नुतन संस्था कमिटी सदस्यांनी संस्थेची नूतन वास्तू असावी, अशी संकल्पना मांडली व तसे प्रयत्न सुरू होते. अखेर नाबार्ड व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संयुक्त सहकार्याने संस्थेच्या नविन इमारतीचे पाट शेतक-यांनी व संस्थेने पाहीलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. संस्थेने आतापर्यंत भाड्याने गोडावून घेउन गरज भागवली. संस्थेचे खतविक्री, बि-बियाणे विक्री, औषध विक्री विभाग असुन संस्था नफ्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!