*कोकण Express*
*देवगड मध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा!*
*आमदार नितेश राणे यांची मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी!*
*मत्स्य उद्योगासंदर्भात अन्य बाबींकडे ही वेधले लक्ष!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि मी . लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्गमध्ये आहे. समुद्र किनारपट्टीलगतच्या ८७ गावामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी हा तेथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. एकूण मच्छीमारांची लोकसंख्या 32017 आहे . त्याचप्रमाणे विजयदुर्ग , देवगड, मालवण, वेंगुर्ले या ठिकाणी बंदरे व मच्छी उतरनावळ करणारे ३४ धक्के आहेत. एकूण १८२१ यांत्रिकी व 1429 बिगर यांत्रिकी व छोटया होड्या या द्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. जिल्हयामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस असून त्याद्वारे माशांवर प्रक्रिया केली जाते . असे असूनही जिल्ह्यामध्ये मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय, शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी जिल्ह्यातील जनतेची बरेच वर्षांची मागणी आहे. सदर ठिकाणी मत्स्य व्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक असे योग्य , निमखारे व गोड्या पाण्याचे स्त्रोत्र उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक पुरेशी जागा, दळणवळणाच्या सुविधा व आनंदवाडी सारखा मोठा प्रकल्प प्रगती पथामध्ये आहे. देवगड येथे महाविद्यालय सुरू झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरी व आवश्यक असणाच्या पदवी , पदव्युत्तर डॉक्टरेट सारख्या पदव्या प्राप्त करणे सोईचे होईल . जेणेकरून जास्तीत जास्त तरूण हे शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनावर कार्यरत होतील. तसेच स्वतःचे उद्योग सुरू करतील. तरी जनतेच्या मागणीनुसार देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला त्वरीत मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माझी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत उपस्थित होते.

