*कोकण Express*
*राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा*
*कासार्डे; संजय भोसले*
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग द्वारे जिल्हास्तरीय खुल्या गटातील योगासन स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे पहिला गट वय वर्षे 9
ते 14 वर्षे पर्यंत राहील, दुसरा गट वय वर्षे 14 ते 18 वर्षाचा असेल आणि तिसरा वयोगट वय वर्षे 18 वर्षाच्या वर असणार आहे. या गटामध्ये ट्रॅडिशनल योगासन स्पर्धा, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पियर, रिदमिक पेअर अशा चार प्रकारच्या गटामध्ये मुले व मुलीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धेमधून तीन प्रमुख स्पर्धक निवडण्यात येतील व त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. मुले आणि मुली हा स्वतंत्र गट राहणार आहे. तरी ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी योगाच्या सिलॅबससाठी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डाॅ तुळशीराम रावराणे मोबा.7083602504 यांच्याशी तसेच डॉ. वसुधा मोरे मोबा. 7774876395 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा योगासन असोसिएशनचे समन्मवयक डाॅ. तुळशीराम रावराणे यांचेमार्फत करण्यात आले आहे. तसेच सदर स्पर्धेमधे भाग घेण्यासाठी आॅनलाईन गुगल फाॅर्म लिंक ठेवण्यात आली असुन ती http://forms.gle/TFLAt3UnHNG2VmvFA अशी आहे .या जिल्हाचँपीयनशिप रजिस्ट्रेशन गुगल फाॅर्म लिंक वर शुक्रवार दि. 26 आॅगस्ट पर्यंत संध्याकाळ पर्यंत इपले फाॅर्म आॅनलाईनच भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

