*कोकण Express*
*वैभववाडी तालुका कोकीसरे जिल्हा परिषद मेळाव्यामध्ये कोकिसरे उपतालुका प्रमूख पदी श्रीराम शिंगरे तर उपविभाग प्रमुख पदी यशवंत गवाणकर यांच्या नियुक्त्या जाहीर*
*कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड*
*वैभववाडी ःःप्रतिनिधी*
वैभववाडी तालुका कोकिसरे येथे झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद मेळाव्यामध्ये कोकीसरे गावचे श्रीराम शिंगरे यांची उप तालुका प्रमुख पदी तर कोकिसरे उप विभाग प्रमुख पदी यशवंत गवाणकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
त्यांची ही निवड शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी तालुका प्रमुख नलिनी पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री संदीप सरवणकर ,माजी सभापती रमेश तावडे ,संभाजी रावराणे ,जावेद पाटणकर, रोहित रावराणे ,राजेश तावडे ,माजी सभापती माई सरवणकर, गौस पाटणकर, रोहीत पावसकर ,चंद्रकांत आम्रस्कर ,बाबू तावडे ,समाधान काडगे ,श्रीकांत डाफळे, आनंद नांदलस्कर, कोकिसरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

