भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

*कोकण Express*

*भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन*

*भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्याची घोषणाबाजी*

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रक्कमे पासून वंचित आहेत.लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी या मागणीसाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधान भवन परिसर या आमदारांनी दणाणून सोडले.

राज्य सरकारच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे निश्चित करून शेतकऱ्यांकडून उच्चांकी भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताला १९४० रु वाढीव दर व ७०० रु बोनस रक्कम देखील देण्यात आला. गतवर्षी पेक्षा जास्त दर यावर्षी देण्यात आला. मात्र सरकार बदलल्याने बोनसची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणावर होत असून, या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणे गरजेचे असून लवकरात लवकर हि रक्कम मिळावी यासाठी आंदोलन केल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!