आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग विमानतळावर दुसरे विमान दाखल ; प्रवाशांचे भाजपातर्फे स्वागत

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग विमानतळावर दुसरे विमान दाखल ; प्रवाशांचे भाजपातर्फे स्वागत

*कोकण Express*

*आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग विमानतळावर दुसरे विमान दाखल ; प्रवाशांचे भाजपातर्फे स्वागत*

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळावर दुसरे विमान दाखल झाले. यावेळी मुंबई ते सिंधुदुर्ग नवीन विमानातून आलेल्या प्रवाशांचे भाजपातर्फे स्वागत करण्यात आले.या स्वागतासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, सुनील चव्हाण, प्रणव वायंगणकर, सुधीर पेडणेकर, निलेश घोगळे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग विमानतळावर १८ ऑगस्ट पासून सिंधुदुर्ग विमानतळावर अलाईंस एअरची नवीन विमान फेरी सुरु झाली आहे. सोमवारी संध्याकाळी ४.२०ला हे दुसरे विमान दाखल झाल्यानंतर त्यातून उतरलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.
कोकणात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. कोकणातील प्रत्येक घरोघरी मुंबईतून एक तरी चाकरमानी दाखल होत असतो. सध्या गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर दुसरे विमान उतरेल, अशी घोषणा भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. तशी सेवा सुरु झाल्याने चाकरमान्यांना दोन तासात मुंबइर्तून गावी पोहोचता येत आहे.
गौरी गणपतीच्या सणात कोकणात येणाऱ्यांसाठी आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय हवाईमंत्री यांच्यांशी चर्चा करुन चिपी विमातळावर दुसरे विमान सेवा सुरु केली होती.मात्र गेले काही दिवस सातत्याने खराब हवामानाचा फटका चिपी विमानतळाच्या विमान सेवेला बसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!