सावली फाउंडेशनच्या वतीने बोर्डवे गावातील आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना ब्लॅंकेट व साबण वाटप

सावली फाउंडेशनच्या वतीने बोर्डवे गावातील आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना ब्लॅंकेट व साबण वाटप

*कोकण Express*

*सावली फाउंडेशनच्या वतीने बोर्डवे गावातील आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना ब्लॅंकेट व साबण वाटप*

माझे प्राथमिक शिक्षण याच बोर्डवे गावात झाले त्यामुळे या गावाशी व इथल्या लहान मुलांची, लोकांशी, इथल्या मातीशी माझे लहानपणापासूनच ऋणानुबंध जोडलेले आहेत. लहान मुलांची वस्तीशाळा सांभाळणे व ती यशस्वीपणे चालवणे हे काम काही सोपे नाही . बोर्डवे गावच्या उषा गोसावी मॅडम व त्यांचे सर्व सहकारी मिळून हे वस्तुतिगृह बरीच आव्हान पेलवत खूप यशस्वीरित्या चालवत आहेत या वस्तीगृहाला भविष्यात आमच्या संस्थेकडून वेळोवेळी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुशांत दळवी यांनी दिले.
संस्थेचे रत्नागिरीतील प्रशिक्षक श्री कांबळे सर यांनी देखील लहान मुलांचे मनोरंजन व प्रबोधन पर मार्गदर्शन केले
यावेळी सावली संस्थेचे कार्याध्यक्ष सुशांत दळवी. संस्थेचे संयोजक प्रसाद देसाई संस्थेचे सचिव उद्धव शिंदे संस्थेचे सभासद संतोष पुजारे ,सदानंद चव्हाण ,भुपेश चव्हाण,अभिषेक देसाई, प्रमोद घाडीगावकर तसेच बोर्डवे गावातील रणजीत साळवी,शोभा बागवे. ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!