ओसरगाव टोलनाक्यावर MH 07 वाहनांना टोल माफी

ओसरगाव टोलनाक्यावर MH 07 वाहनांना टोल माफी

*कोकण Express*

*ओसरगाव टोलनाक्यावर MH 07 वाहनांना टोल माफी*

* एम.डी.करीमुन्नीसा कंपनीने आमदार नितेश राणे यांना दिले पत्र*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत ओसरगाव टोलनाक्यावर गणेशोत्सव कालावधीत सफेद नंबर प्लेट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिगर व्यावसायिक MH 07 पासिंग च्या वाहनांना टोल माफी देण्यात आल्या ची माहिती आमदार नितेश राणे यांना हायवे टोल वसुली ठेकेदार कंपनी एम.डी. करीमुन्नीसा यांनी दिली आहे.
आम्ही स्वतःच्या रिस्कवर ही टोल माफी देत असल्याचे टोल वसुली ठेकेदार कंपनीने या पत्रात म्हटले आहे. मागणी मान्य झाल्याबाबतचे पत्रच आम. नितेश राणे यांनी माध्यमांकडे दिले आहे.त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्यासोबत हायवे टोल ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा देखील झाली होती. असे या पत्रात म्हटले आहे. तसेच आमदार नितेश राणे यांच्याशी बोलणे झाल्याप्रमाणे स्थानिकांना ओसरगाव टोल नाक्यावर नोकरी देण्यात आल्याचेही या पत्राद्वारे ठेकेदार कंपनीने म्हटले आहे. महामार्ग चौपदरीकरणाची अपूर्ण कामे, मोबदला वितरण तसेच भूसंपादन, भरपाई व टोल नाक्यावर स्वच्छतागृहांची व्यवस्था याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे समन्वयक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवाहन देखील टोल ठेकेदार कंपनीने आम. राणे यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!