*कोकण Express*
*वैभववाडी तालुका कृषीसेना तालुकाप्रमुख पदी खांबाळे गावचे प्रगतशील शेतकरी, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड*
*कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुका कृषीसेना तालुकाप्रमुख पदी खांबाळे गावचे प्रगतशील शेतकरी, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड यांची निवड कुडाळ-मालवणचे शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
प्रविण गायकवाड हे खांबाळे गावातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे त्यांनी शेतीतील नवनवीन प्रयोग करून यशस्वी केलेले आहेत. ते कृषी पदवीधर असल्याने त्याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना व शिवसेना संघटना वाढीसाठी होईल. त्यांची ही निवड शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या सूचनेनुसार लोरे विभागीय मेळाव्यात जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी तालुका प्रमुख नलिनी पाटील, माजी जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, लोरे विभागप्रमुख तथा लोरे सरपंच विलास नावळे, महेश रावराणे, अनिल नराम, उपविभागप्रमुख सूर्यकांत परब, लोरे युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमूख विनोद पेडणेकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, माजी सरपंच नाना रावराणे, दिलीप मांजलकर लोरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

