*महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन अपघात*
*होत एक जण ठार तर तीन जण जखमी*
ओसरगाव तलावाजवळ महामार्गावर पहाटे ५.३० च्या दरम्यान गोवा ते कोल्हापूर अशी जात असलेली तवेरा कार कार न. MH११ BZ ९०७५ पलटी होत या कार मधील सुकुमार देवाप्पा चौगुले वय २९, रा. शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर हे ठार झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली .या कारमध्ये मध्ये ८ प्रवासी होतें. यातील तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात देवदत्त कुंभार वय २९ यांच्या उजव्या हातात दुखापत झाली आहे अभिजीत देशमुख राहणार कोल्हापूर यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे . पहाटेच्या सुमारास चालकाचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्यालगतच्या डिव्हायडर ला धडकून अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.