*कोकण Express*
*लोरे नं. 2 माजी सरपंच तथा राणे समर्थक नाना रावराणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
*शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधले शिवबंधन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 गावचे माजी सरपंच व लोरे विभागाचे माजी विभागीय अध्यक्ष व राणे समर्थक नाना रावराणे यांनी अखेर लोरे शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. गेले अनेक महिने नाना रावराणे अतुल रावराणे यांच्या संपर्कात होते व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसेच ते एक आक्रमक कार्यकर्ते म्हणुन ओळखले जातात. तसेच त्यांनी अनेक वर्षे सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांचा लोरे विभागात जनसंपर्क खूप चांगला आहे. त्यामुळे लोरे विभागात आणि तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्याचा फायदा होईल.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम सावंत, जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी तालुका प्रमुख नलिनी पाटील, माजी जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, लोरे विभागप्रमुख तथा लोरे सरपंच विलास नावळे, महेश रावराणे, अनिल नराम, उपविभागप्रमुख सूर्यकांत परब, लोरे युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमूख विनोद पेडणेकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, दिलीप मांजलकर, लोरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

