सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळेला साउंड सिस्टीम प्रदान

सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळेला साउंड सिस्टीम प्रदान

*कोकण Express*

*सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळेला साउंड सिस्टीम प्रदान*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. सदाशिव पवार यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मालवण तालुक्यातील सुकळवाड प्राथमिक शाळेला साउंड सिस्टीम प्रदान करण्यात आली.

यावेळी सुकळवाड सरपंच स्वप्नील गावडे, सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या सचिव शुभांगी पवार, सूर्यकांत पाताडे, हरिश्चंद्र सरमळकर, हर्षदा सरमळकर, नुपूर पवार, ऋजुता चव्हाण, उत्तम पाताडे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत दाभोलकर, शाळेच्या मुख्ताध्यापिका लीना भंडलकर आणि शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. सदाशिव पवार यांची प्राथमिक शिक्षक असताना सेवकाळात प्रथम पदोन्नतीने सुकळवाड प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साउंड सिस्टीम शाळेला भेट देण्यात आली. कै. सदाशिव पवार यांच्या स्मृतिनिमित्त प्रतिवर्षी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध शैक्षणिक , सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी ऑनलाइन आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार यांनी आपले वडील कै. सदाशिव पवार यांच्या सुकळवाड प्राथमिक शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुकळवाड सरपंच स्वप्नील गावडे यांनी सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या या अत्यंत स्तुत्य उपक्रमा विषयी गौरवोद्गार काढले आणि पवार गुरुजी यांच्या स्मृती कायमस्वरूपी शाळेमध्ये जागवल्या जातील अशा शब्दांत प्रतिष्ठान विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल बोलताना ऋजुता चव्हाण यांनी आपले वडील सदाशिव पवार यांना शाळा आणि शाळेच्या सर्वांगीण विकासाबद्दल नेहमीच आस्था होती. साउंड सिस्टीम विद्यार्थ्यांच्या प्रगतीला पूरक ठरेल असे आपल्या मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन व आभार मधुकर बाचीपळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!