कासार्डेतील मुद्राळे हेल्थ झोन मार्फत झालेल्या स्काॅट आणि डेड लिफ्ट स्पर्धेत अनेक स्पर्धकानी चमकदार कामगीरी केली

कासार्डेतील मुद्राळे हेल्थ झोन मार्फत झालेल्या स्काॅट आणि डेड लिफ्ट स्पर्धेत अनेक स्पर्धकानी चमकदार कामगीरी केली

*कोकण Express*

*कासार्डेतील मुद्राळे हेल्थ झोन मार्फत झालेल्या स्काॅट आणि डेड लिफ्ट स्पर्धेत अनेक स्पर्धकानी चमकदार कामगीरी केली*

*कासार्डे;संजय भोसले*

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सर्वत्र वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते असाच एक कार्यक्रम वैभव मुद्राळे हेल्थ झोन, कसार्डे येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आला. टीम वैभव यांच्या वतीने व्यायाम शाळा मर्यादित काही स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात स्कॉट आणि डेड लिफ्ट ह्या प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली त्यात अनुक्रमे प्रथम गटात अभिजीत कांबळे प्रथम क्रमांक, संजय गुरव द्वितीय क्रमांक, प्रल्हाद सावंत तृतीय क्रमांक. गट क्रमांक दोन मध्ये प्रथम क्रमांक यश आडोलीकर, द्वितीय क्रमांक मंगेश पावसकर, तृतीय क्रमांक अशितोष मोहिते. गट क्रमांक तीन प्रथम क्रमांक अभिजीत तावडे, द्वितीय क्रमांक कल्पेश तळेकर, तृतीय क्रमांक साईप्रसाद वानोळे. गट क्रमांक चार मध्ये प्रथम क्रमांक हर्षद देसाई, द्वितीय क्रमांक नितीन पेडणेकर, तृतीय क्रमांक सुरज शेलार. गट क्रमांक पाच मध्ये प्रथम क्रमांक करण राबरी, द्वितीय क्रमांक संकेत राठोड, तृतीय क्रमांक अथर्व डंबे. उत्तेजनार्थ कल्पेश सावंत या सर्वांनी बाजी मारली. ह्या संपूर्ण स्पर्धेचा स्ट्रॉंग मॅन भूषण कुबडे यांनी मान मिळवला.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी श्री योगेश वायंगणकर तसेच श्री साई डंबे,श्री संजय गुरव, श्री देवेंद्र पताडे, श्री दिपक पताडे, विनायक केसरकर, कैलास पवार, सुधीन कुलकर्णी,राहुल पाताडे, सावी मुद्राळे आणि टीम वैभव चे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व सहभागी स्पर्धक आणि सर्व साह्य करणाऱ्या सर्वांचे व्यायाम शाळेचे संस्थापक श्री वैभव मुद्राळे यांनी आभार व्यक्त केले तसेच स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!