कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती

*कोकण Express*

*कणकवली पोलीस निरीक्षकपदी पुन्हा सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पोलीस निरीक्षक म्हणून शनिवारी फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती जिल्हा वाहतूक शाखा येथे करण्यात आली.तर कणकवली पोलीस निरीक्षक पदावर पुन्हा सचिन हुंदळेकर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सद्याचे कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांना कुडाळ पोलीस ठाण्यात बदलीचे आदेश दिले आहेत.शनिवारी पहिला आदेश २ अधिकाऱ्यांचा आणि काही क्षणात कणकवलीत पुन्हा श्री. हुंदळेकर यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारण्याचा नवीन आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिला आहे.तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

कणकवली पोलीस ठाण्याला कायमस्वरुपी पोलीस निरीक्षक म्हणून सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती आहे. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत त्यांना तात्पुरती नेमणूक मुख्यालयात देण्यात आली होती. काल झालेल्या बदलीमध्ये पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात सचिन हुंडळेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!