खारेपाटण -भुईबावडा रस्ता गणेशचतुर्थीपूर्वी दुरुस्त करा

खारेपाटण -भुईबावडा रस्ता गणेशचतुर्थीपूर्वी दुरुस्त करा

*कोकण Express*

*खारेपाटण -भुईबावडा रस्ता गणेशचतुर्थीपूर्वी दुरुस्त करा*

*अन्यथा जनआंदोलन ; उद्योजक सुनील नारकर यांचा इशारा

*वैभववाडी ः प्रतिनिधी* 

खारेपाटण-भुईबावडा रस्ता खड्डेमय झाला असून वाहने चालविणे मुश्कील झाले आहे. ठेकेदाराने निर्धारित वेळेत काम केले नसल्यामुळे रस्त्याची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे. कोरोनानंतर गणेशोत्सव सण उत्साहात साजरा करण्यासाठी गणेशभक्त आसुसले आहेत. मात्र रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असल्यामुळे चाकरमानी आणि गावातील स्थानिक गणेशभक्त वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थी पुर्वी रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा समाजसेवक सुनील नारकर यांनी दिला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. त्यात महत्त्वाचा मार्ग असणाऱा खारेपटण-भुईबावडा मार्ग खड्डेमय झाला आहे. करुळ घाट जड, अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटाने सुरू आहे. त्यामुळे अधिकच मार्गाची दुरावस्था झाली आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर रस्त्याची झालेली अवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. वैभववाडी तालुक्यासह राजापूर, रत्नागिरीसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. बरेचसे गणेश भक्त याच मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे हा मार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहे. परंतु ठेकेदाराने वेळेत काम न केल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या नुतनीकरणाचे काम मंजूर झाले आहे. मात्र ठेकेदाराने कामात दिरंगाई केली. त्यामुळे पावसाळापुर्वी काम होऊ शकले नाही. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!