अवांतर वाचन सर्वोत्तम असून मोबाईलचा अतिवापर घातकच—सदाशिव पांचाळ

अवांतर वाचन सर्वोत्तम असून मोबाईलचा अतिवापर घातकच—सदाशिव पांचाळ

*कोकण Express*

*अवांतर वाचन सर्वोत्तम असून मोबाईलचा अतिवापर घातकच—सदाशिव पांचाळ*

*कासार्डे;संजय भोसले*

मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्यूमर, कर्करोग, आम्ब्लोपिया सारखे भीषण परिणाम समोर येत असल्याने अवांतर वाचन हा उत्कृष्ट पर्याय असल्याचे मतण एज्युकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी व्यक्त केले.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत तळेरे
ग्रामपंचायतीच्या वतीने वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय येथे ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावरिल व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी सदाशिव पांचाळ प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच साक्षी शैलैश सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, वामनराव महाडिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, समाजसेवक राजेश जाधव, जि.प. प्रा. शाळा वाघाची वाडी येथील मुख्याध्यापक संतोष तेरवणकर, आदर्श प्रा. शाळा नं‌. १ च्या शिक्षिका सौ. बेळणेकर, अन्य शिक्षक वृंद, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्यूमर होऊ शकतो, रेडिएशन मुळे कर्करोग, रात्रीच्या अंधारात मोबाईल वापरल्यास आम्ब्लोपिया सारख्या व्याधी अल्पवयीन मुलांना होऊ शकतात. त्यामुळे अगदीच गरज असेल तर आणि तरच मोबाईल वापरावा. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना हार्ट अटॅक आल्याचे दाखले पांचाळ यांनी यावेळी सादर करत मोबाईल किती घातक आहे, यांचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने याला अवांतर वाचन एक उत्कृष्ट पर्याय आहे. वाचनामूळे बौध्दिक क्षमता वाढतील, आकलन शक्ती वृध्दिंगत होईल, भाषा सुधारेल, वक्तृत्व, लिखाण करणे, विचार प्रक्रिया विकसित होणे, यांसारख्या अनेक चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडून शकतात, असेही यावेळी पांचाळ यांनी सांगितले.

यावेळी सरपंच साक्षी सुर्वे यांच्या हस्ते सदाशिव पांचाळ यांचा सन्मान करण्यात आला. राजेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!