सिंधुदुर्गात 25 डॉक्टरांची नियुक्ती ऑटो जनरेट पद्धतीने – संजना सावंत

सिंधुदुर्गात 25 डॉक्टरांची नियुक्ती ऑटो जनरेट पद्धतीने – संजना सावंत

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात 25 डॉक्टरांची नियुक्ती ऑटो जनरेट पद्धतीने – संजना सावंत*

*सिंधुदुर्ग*

कोणत्याही जिल्ह्यामध्ये डॉक्टरची नियुक्ती होते त्यामध्ये त्यांच्या नियुक्तीची एक सिस्टीम ठरलेली आहे. डॉक्टरांची नियुक्ती होताना कोणाचीही शिफारस लागत नाही. ऑटो जनरेट पद्धतीने त्यांची नियुक्ती होते. डीएमईआर director of medical education and research अशी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे. एमबीबीएस पूर्ण झाल्यावर डॉक्टर या वेबसाईटवर त्याची अधिकृत नोंदणी करतात व आपली पूर्ण माहिती भरतात. त्यानंतर राज्यस्तरावर ज्या ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत. त्या ठिकाणी ते सिस्टीम द्वारे ऑटो जनरेट पद्धतीने कोणत्याही जिल्ह्यामध्ये नियुक्त केले जातात. त्यासाठी कोणाच्याही शिफारशीची गरज नसते. अगदी याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये 25 डॉक्टर आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!