आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान

आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान

*कोकण Express*

*आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान*

*नितेश राणेंवरील आरोप बिनबुडाचे; नगराध्यक्ष समीर नलावडे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेला उमेदचा व्यवस्थापक शिवाजी खरात यांला आम. नीतेश राणे यांनी कोणतीही मारहाण केलेली नाही. तसेच खरात यांने दिलेल्या स्टेटमेंट मध्ये आपणासा आम. नितेश राणेंकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झाले नसल्याचे खरात यांने स्वतःच नमूद केले आहे. मात्र आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान रचले आहे. असा आरोप कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषद कणकवली येथे केला. कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेऊन पारकर यांनी केलेल्‍या आरोपांचा समाचार घेतला.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण आदी उपस्थित होते. नलावडे म्‍हणाले, आम. नीतेश राणे हे नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्यावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्‍या आहेत. देवगड येथील उमेद प्रकल्‍पात काम करणाऱ्या महिलेवर अन्याय झाला म्‍हणून तो प्रश्‍न सोडविण्यासाठी आम. नितेश राणे तेथे गेले होते. तेथेही त्‍यांनी सामोपचाराने प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्‍न केला. शिवाजी खरात याला कसलीही मारहाण केली नाही. तसेच खरात यानेही आपल्‍या पहिल्‍या तक्रारीत राणेंनी मारहाण केली असे कुठेही नमूद केलेले नाही. नलावडे म्‍हणाले, आमदार नीतेश राणे यांना बदनाम करण्यासाठी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी खरात याला आमदार राणेंवर खोटे आरोप करायला लावले. मात्र पोलीस तपासात सत्‍य काय ते निश्‍चितपणे बाहेर येईल.

पुढे नगराध्यक्ष नलावडे म्‍हणाले, खरात हा शासकीय सेवतेतील कायमस्वरूपी कर्मचारी नाही. तर कॉन्ट्रॅक्‍ट बेसिसवरील कर्मचारी आहे. त्‍याने यापूर्वी कणकवली कृषी विभागात कंत्राटी पद्धतीवर काम केले होते. मात्र येथे काम करत असतानाही असेच उपद्‌व्याप करण्यात आल्‍याने त्‍याला सेवेत कायम केलेले नाही. त्याचप्रमाणे उमेद प्रकल्‍प व्यवस्थापक म्‍हणून काम करताही खरात याने हाताखालील कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिलेली नाही. त्‍याबाबतच्या ऑडिओ क्‍लिप आमच्याकडे आहेत वेळ आल्‍यास त्या आम्‍ही जाहीर करणार आहोत. दरम्‍यान वैभव नाईक यांनी तर कुडाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना धक्‍काबुक्‍की केली होती. त्‍याचप्रमाणे संदेश पारकर यांनीही कणकवलीत पोलीस अधिकाऱ्याच्या कॉलरला हात घातला होता. त्‍यामुळे त्‍यांनी विनाकारण आमदार नीतेश राणेंवर आरोप करू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!