*कोकण Express*
*सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे ता.कणकवली या संस्थेमार्फत गरजु विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत*
*कासार्डे;संजय भोसले*
सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे ता.कणकवली या संस्थेमार्फत गरजु विध्यार्थ्यांना यांना मदत केली जाते १५ ऑगस्ट २०२२ रोजी माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त कॉलेज विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्यात आले.
त्यावेळी संस्था अध्यक्ष प्रसाद देसाई, कार्याध्यक्ष सुशांत दळवी,संस्थेचे सभासद पप्पू पुजारे,सदानंद चव्हाण,अभिषेक देसाई तसेच बिडवाडी गावचे सरपंच सुदाम तेली, पिसेकामते सरपंच सुहास राणे संस्था कार्याध्यक्ष विजय चव्हाण, मुख्याध्यापक जोशी,शाळा समिति अध्यक्ष दत्ताराम हिदळेकर उपसरपंच सुरेश बावकर ग्रामपंचायत सदस्य आनंदराव साटम, जांभवडेकर आणि समिति सदस्य पांडुरंग मगर,अभिमन्यू लाड, सचिन मगर, पोलिस पाटील श्री.राणे, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.वह्या वाटप कार्यक्रमानंतर संस्था राबवत असलेल्या सामजिक उपक्रमाबद्दल गावाच्या वतीने आभार मानण्यात आले.

