*महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त*

गदिमा प्रेमी कलावंत साहित्यिक यांच्यावतीने आज अनोखे जागर आंदोलन

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

महाकवी ग दि माडगूळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे यासाठी सावंतवाडीतील गदिमा प्रेमी कलावंत साहित्यिक यांच्या वतीने आज त्यांच्या १४ डिसेंबर पुण्यतिथी दिनानिमित्त अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कवितांचा जागर करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
सावंतवाडी मोती तलावाच्या काठी श्रीराम मंदिर वाचनालय समोरील कट्यावर आज सकाळी ११ वाजता गदिमां फोटोला ज्येष्ठ लेखक कादंबरीकार प्रा. जी ए बुवा यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून पुण्यतिथी व कविता जागरण उद्घाटन करण्यात आले. या जागराला नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला.

यावेळी या आंदोलनाचे प्रमुख कोमसापचे अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष अँड संतोष सावंत ,प्रा. रुपेश पाटील, साहित्यिक बाळकृष्ण लळीत, शामसुंदर नाडकर्णी, महेश आरोलकर, सहदेव धर्णे, डॉ. मधुकर घारपुरे, नरेश आकेरकर, किशोरी गव्हाणकर, घनशाम गावडे, सुधाकर जोशी, विद्या लळीत, सविता लळीत, आदी उपस्थित होते
यावेळी गदिमांच्या कविता व गीत सादर करण्यात आल्या उद्धवा अजब तुझे सरकार या गीताच्या जागराने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कानडा-राजा-पंढरीचा फिरत्या चाकावरती देसी अशी एक गीत गाऊन हे स्मारक लवकरात लवकर व्हावेत अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देत पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!