*कोकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षा (STS)2022 चा बक्षीस वितरण समारंभ*
*आमदार नितेश राणे यांच्या हस्ते समारंभ संपन्न*
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेन्ट सर्च परीक्षा (STS)2022 चा बक्षीस वितरण समारंभ आज मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा आर पी डी हायस्कूल सावंतवाडी मा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी मा श्री विकास सावंत, ,मा श्री संजू परब, (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी) मा श्री प्रमोद कामत, (माजी शिक्षण सभापती) मा सौ शर्वणी गावकर, मा सौ श्वेता कोरगावकर, मा सौ उन्नती धुरी, मा सौ पल्लवी राऊळ(माजी जि प सदस्या), अक्रम खान (सरपंच बांदा)आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2 लाख रुपयांची पारितोषिके, Education tab, आकर्षक भेटवस्तू, सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात तसेच युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदारांनी युवा संदेश प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्याना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपसथितांनी उपक्रमाचे कौतुक केले.
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोटया सावंत यांनी पुढील वर्षापासून इयत्ता ६वी व ७वी जिल्हात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास लॅपटॉप बक्षीस देण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले

