*कोकण Express*
*कन्हैया पारकर हीच कणकवली साठी खरी लाजिरवाणी बाब*
*बांधकाम व्यवसायाच्या नादात सुशांत नाईक अमृत महोत्सव विसरले होते*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली नगरपंचायत च्या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांची हे आरोप अज्ञानपणातून व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करण्यासाठीचे आहेत. नगरपंचायत च्या इमारतीचा रंग काढून सुशोभीकरण करण्याकरिता नियमानुसार निविदा काढण्यात आली आहे. व ही निविदा शिवसेनेच्या नगरसेवकांनी काल तक्रार देण्यापूर्वी काढलेली आहे. हे श्री नाईक व पारकर यांना माहिती असल्याने त्यांनीही जाणीवपूर्वक तक्रार केली आहे. आमच्या तक्रारीमुळे निविदा निघाली, किंवा इमारतीचा रंग काढला असे त्यांना म्हणण्याकरिता कोणतीही संधी नाही. हे अगोदर नाईक, पारकर व त्यांच्यासोबत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात श्री परुळेकर यांनी म्हटले आहे, कणकवली नगरपंचायतने 13 ते 15 ऑगस्ट पर्यत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कार्यक्रम, उपक्रम राबवले. मात्र त्यात आता गळा काढणारे नाईक व पारकर केव्हा दिसले नाहीत. आपल्या बांधकाम व्यवसायातून नाईक यांना अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला वेळ मिळाला नसेल. व सत्तेतून पायउतार झालेल्या धक्क्यातून कदाचित नाईक सावरले नसतील व त्यामुळेच ते कदाचित आले नसतील. किंवा अमृत महोत्सव आहे हे कदाचित त्यांना 15 ऑगस्ट दिवशी समजले असेल. कारण इतर वेळी नगरपंचायत मध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसणाऱ्या नाईक यांना या पूर्वी अशी मागणी देखील करता आली असती. पण ती त्यांनी केली नाही. तर नगरसेवक कन्हैया पारकर यांचा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा कोणताही सुताराम संबंध नाही. त्यांच्याकडून शहरवासीयांची ही अपेक्षा देखील नाही. कारण तक्रार करणे व आपले अज्ञान कणकवली समोर प्रकट करणे ही कन्हया परकर यांची जुनी पारंपारिक आवड आजही ते जोपासत आहेत. राहिला प्रश्न इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा. ज्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या त्यातील अनेक जण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे स्वतः ची कामे घेऊन येत असतात. काही जण घरा जवळ येऊनही भेटतात. पण त्यांनी या भावना केव्हा व्यक्त केलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे हे निवेदन येत्या नगरपंचायत निवडणुका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिले आहे सांगण्यासाठी कुणाही ज्योतिषाची गरज नाही. कोणत्याही इमारतीचे पावसाळ्यात रंगकाम करणे योग्य ठरणारे नाही. रंगकाम करत असताना जर रंग पावसाने वाहून गेला तर आता निवेदन देणारे हेच नाईक व पारकर भ्रष्टाचार झाला म्हणून आता नाही म्हणून सांगितली तरी ओरड मरणार होते. तसेच नियमानुसार निविदा मंजूर होत नाही त्यापूर्वी काम केले तरी नाईक व पारकर यांच्याकडून निविदा मंजूर होण्यापूर्वीच काम झाले अशा तक्रारी देखील होणार होत्या. व कन्हैया पारकर यांचे भाऊ सरपंच किंवा नगराध्यक्ष होते त्यावेळी काम होण्यापूर्वी पैसे काढणे तसे प्रकार आताच्या सत्तेत चालत नाहीत हे जनतेला देखील माहिती आहे. कणकवलीतील जनतेला कन्हैया पारकर यांच्या सवयी माहिती असल्याने जनता सुज्ञ आहे व त्या सुज्ञ जनतेला कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी म्हणून नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सत्ताधारी हे योग्य पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभार करतात ते देखील माहिती आहे. सुशांत नाईक हे निवडून आलेले नगरसेवक आहेत. अमृत महोत्सव साजरा करण्याच्या संपूर्ण कार्यक्रमात जनतेने निवडून दिलेले नगरसेवक म्हणून त्यांचे योगदान काय? एवढ्या वर्षात सुशांत नाईक नगरपंचायत मध्ये केव्हा झेंडावंदनला उपस्थित नव्हते ते आताच ठाकरे यांची सत्ता गेल्यावर का उपस्थित राहू लागले? असा प्रश्न देखील त्यांना मतदान केलेल्या लोकांना पडला आहे. कणकवली नगरपंचायत ला अमृत महोत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारचा निधी वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाला नव्हता. तरीदेखील नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी व नगरपंचायत प्रशासनाने उस्फूर्तपणे विविध उपक्रम राबवत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन केले. व ते प्रत्यक्षात आणले. पण काल झेंडावंदनला आलेले नाईक व पारकर यांनी नगरपंचायत ची पायरी चढून नगरपंचायतने राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेण्याची देखील भावना दाखवली नाही. त्यामुळे यातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची पारकर व नाईक यांना किती आपुलकी, जिव्हाळा व स्वातंत्र्यप्रेम होते देखील दिसून आले. कणकवली नगरपंचायत ने कणकवली शहरातील इतर सर्व कामे केली फक्त इमारतीचे सुशोभीकरणाचे काम राहिले हे देखील शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे मान्य केले. कणकवली नगरपंचायत ने आपल्या इमारतीच्या स्वच्छतेकडे डोळे झाक केली असे आरोप करणाऱ्या या बेघर झालेल्या ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांनी नगरपंचायत ने राबवलेल्या उपक्रमांकडे मात्र डोळेझाक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचा अवमान केल्याचे सांगत कन्हैया पारकर आपण राजकारणात किती उच्च पदस्थ नेत्यांची नावे घेऊन बोलू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना गल्लीत कोण विचारत नाहीत ते दिल्लीतल्या व जगातल्या सर्वोच्च नेत्यांची नावे घेऊन आपले राजकारण करू पाहत आहेत. पण याच पारकर यांना त्यांच्या पक्षाचेच लोक स्वीकारत नाहीत. त्यामुळे मोदींवर बोलताना पारकर यांनी आपली लायकी ओळखावी. कणकवलीकर हे सुज्ञ आहेत व त्यामुळेच सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कणकवलीकरांनी नगरपंचायत ची सत्ता त्यांच्याकडे दिली. त्यामुळे या गोष्टीचा विचार केला तर कन्हैया पारकर हीच कणकवलीकरांसाठी खरी लाजिरवाणी बाब आहे व ते कणकवलीकरांनी ओळखले म्हणूनच कन्हैया पारकर यांना त्यांच्या सख्ख्या भावाने देखील तिकीट नाकारले. याचे अगोदर श्री. पारकर यांनी आत्मपरीक्षण करावे. कणकवली चा इतिहास पारकर यांना माफ करणार नाही ही वस्तुस्थिती खरी आहे. आतापर्यंत केव्हा खरं न बोललेले कन्हैया पारकर व सुशांत नाईक यावेळी मात्र खरं बोलले. कारण आतापर्यंत सत्ता असताना केलेला भ्रष्टाचार, नगरपंचायत मध्ये माजवलेली अनागोंदी व नगरपंचायत मध्ये सत्ता असताना रस्त्यांच्या खडीची ऑर्डर आपल्या मालकीच्या क्रेशरला मिळून घ्यायची ही सर्व टक्केवारी कणकवलीकरांनी ओळखली व त्यानंतरच श्री. पारकर व नाईक यांना कणकवलीकर जनतेने नाकारले. हा कणकवलीचा इतिहास आहे व हा इतिहास आपल्याला माफ करणार नाही हे मान्य केले हा पण कन्हैया पारकर यांच्या मनाचा मोठेपणा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाईक व पारकर यांनी नगरपंचायत वर अपुऱ्या माहितीच्या आधारावर केलेल्या आरोपामुळे असे अज्ञानी, अकार्यक्षम व अपरिपक्व लोकप्रतिनिधी कणकवलीत आहेत याचीच कदाचित कणकवलीकरांना लाज वाटेल. मात्र अमृत महोत्सवात कणकवलीकरांनी जो आपला वाटा उचलला, कणकवलीतील जनता प्रत्येक उपक्रमात सहभागी झाली. व प्रत्येकाने आपला देशाभिमान जागवला त्यावेळी हे पारकर व नाईक आपल्या फुटत असलेला ठाकरे गट सांभाळण्याच्या नादात होते. त्यावेळी यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विसर पडला. नगरपंचायत च्या इमारतीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच पक्षाच्या अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करावी. जेणेकरून कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामे थांबतील व जनतेला अनधिकृत बांधकामांपासून होणारा त्रास देखील टळेल. जेणेकरून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची वेळ नगरपंचायत वर येणार नाही असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला आहे
