*कोकण Express*
*कणकवली न.प.इमारती च्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष…!*
*विरोधी नगरसेवकांचा आरोप…!*
*संबंधितांवर कारवाईची प्रांताधिकाऱ्याकडे मागणी…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. यानिमित्ताने स्वच्छते मोहिमेबरोबर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने कणकवली नगरपंचायत प्रशासनाने नगरपंचायत इमारतीच्या बाहेरील स्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायतीच्या इमारतीवर शेवाळ धरुन, झाडे झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी इमारतीचा पुढील भाग अस्वच्छतेचे दर्शन घडवत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासन, प्रशासन आणि सत्ताधारी याच्या माध्यमातून उपक्रम राबविले जात असले तरी स्वच्छतेकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. केंद्राकडून या महोत्सवानिमित्त शासकीय इमारती स्वच्छतेबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असताना स्वच्छतेखाली लाखो रुपये खर्च दाखवून प्रत्यक्षात नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गेली चार वर्षे सत्तेच्या माध्यमातून सार्वजनिक कामामध्ये सुध्दा दिखावा करत आहेत. एकीकडे नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणारी नगरपंचायत स्वतःच्या इमारतीकडे मात्र डोळेझाक करत आहे. त्यामुळे एक प्रकारे देशाच्या पंतप्रधान यांचा आदेश पायदळी तुडवण्याचा महापराक्रम प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी केला आहे. स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नगरपंचायत इमारतीची दयनीय स्थिती ही प्रत्येक कणकवलीकरासाठी लाजेची बाब ठरत आहे. त्याचे उत्तरदायीत्व हे नगरपंचयतीचे सत्ताधारी आणि प्रशासन यांची संयुक्त आणि एकत्रित आहे. भविष्यात राष्ट्राच्या अमृत महोत्सवाच्या इमारतीच्या दुर्दशेचा कधी प्रसिद्ध झाला आणि विरोधी नगरसेवक म्हणून आम्ही याचा आवाज उठवला नाही तर इतिहास आम्हाला माफ करणार नाही याची कणकवलीकर भविष्यात लाज बाळगेल. म्हणून याबाबत आम्ही आवाज उठवत आहोत. इमारतीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी योग्य ती चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी नगरसेवक सुशांत नाईक,शहरप्रमुख उमेश वाळके, नगरसेवक रुपेश नार्वेकर,कन्हैय्या पारकर,युवासेना शहर अध्यक्ष आदित्य सापळे, तेजस राणे आदी उपस्थीत होते.

