देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोवा राज्यपालांच्या हस्ते कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा गौरव

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोवा राज्यपालांच्या हस्ते कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा गौरव

*कोकण Express*

*देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोवा राज्यपालांच्या हस्ते कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा गौरव*

*गोवा राजभवनावर करण्यात आला गौरव*

*कणकवली/प्रतिनिधी*

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळच्या खारेपाटण येथील असलेल्या आणि सध्या गोवा येथे कार्यरत असलेल्या कवयित्री डॉ अनुजा जोशी यांचा गौरव गोवा राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आला. याबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीतून डॉ जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गोव्याचे विद्यमान राज्यपाल श्रीधरन् पिल्लई हे एक उत्तम मल्याळम् लेखक असून ते सातत्याने वैचारिक, चिंतनात्मक व सामाजिक विषयावरचे लेखन करत असतात. त्यांच्याच कल्पनेतून मराठी, संस्कृत व कोकणी भाषाविश्वांच्या सन्मानार्थ चार साहित्यिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त राजभवनावर निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला. या गौरवामध्ये डॉ जोशी यांच्या सोबतच ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो, प्रा.ज्ञानेश्वर पाटील, श्रद्धा गरड आदींचा समावेश होता. पाच ग्राम सुवर्णमुद्रा, पुष्पगुच्छ आणि शाल असे या गौरवाचे स्वरूप होते.
डॉ.अनुजा जोशी या खारेपाटण येथील प्रसिद्ध कथाकार प्राचार्य स्व. शरद काळे यांच्या कन्या असून एक उत्तम कवयित्री अशी त्यांची ओळख आहे.त्यांचे दोन काव्यसंग्रह व ‘शंकर रामाणींची समग्र मराठी कविता’ हा समीक्षात्मक संपादनग्रंथ नुकताच प्रकाशित झाला असून त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या त्यांच्या गुणवत्तेची दखल घेऊन गोवा राजभवनावर गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात झालेला हा सुवर्णसन्मान केवळ माझा वैयक्तिक नसून मराठी साहित्यक्षेत्राचाच हा सन्मान आहे म्हणून तो फार मौलिक वाटला.
याबद्दल राज्यपाल पी. एस् श्रीधरन् पिल्ल‌ई व गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना धन्यवाद देते अशी भावना या गौरवानंतर डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!