*कोकण Express*
*१५ ऑगस्ट व अमृत महोत्सवी वर्षानिम्मित नवीन कुर्ली येथे वक्तृत्व स्पर्धा व गुणगौरव कार्यक्रम*
*जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली कडुन आयोजन*
*नवदुर्गा युवा मंडळाकडुन सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप*
भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित संपुर्ण भारत हर घर तिरंगा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना आज जि. प. पुर्व प्राथमिक शाळा नवीन कुर्ली फोंडाघाट येथे वक्तृत्व स्पर्धा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली आयोजीत इयत्ता पहिली ते चौथी- लहान गट व इयत्ता पाचवी ते सातवी- मोठा गट अशा दोन गटामध्ये सदर स्पर्धेची विभागणी करण्यात आली होती.
तत्पुर्वी १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्लीच्या पटागंणावर नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कोलते यांच्या शुभ हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. जोशी मॅडम सर्व शिक्षक वृंद, गावातील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली आयोजीत वक्तृत्व स्पर्धा व नवदुर्गा युवा मंडळाकडुन शैक्षणिक साहित्य वाटप करुन मुलांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. राजेंद्र कोलते यांनी भुषविले.
भारतीय स्वातंत्र्य दिन, भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महामानव शुरविरांनी दिलेले बलिदान यावर भर देत सर्व स्पर्धकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्य दिनांचे महत्त्व, ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या पारंतत्रातुन स्वातंत्र्य मिळवितांना थोर महापुरुषांनी दिलेले बलिदान, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे योगदान, थोर महापुरुषांचे कार्य आत्मसात करताना मुलांनी जपली जाणारी संस्कृती तसेच विस्थापित कुर्ली गावाचे पुर्नवसन झाल्यानंतर या वसाहतीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा सुरु करत असताना येणारे अडचणी व अडचणीवर मात करुन ग्रामस्थांनी शाळेतील सोडविलेले विविध समस्या त्यामध्ये शाळा डिजीटल करताना ग्रामस्थांनी केलेले आर्थिक सहकार्य, मुलांना कार्यक्रमास लागणारा गावातील लोकांनी स्वखर्चाने उभारलेला मंडप किंवा पाण्याची सतत भेडसावणारी समस्या व त्यावर इंधन बोअरवेल मारुन केलेली सोय किंबहुना शाळेतील अनेक अडचणी यावर ग्रामस्यांचे वेळोवेळी सहकार्य करुन केलेली आर्थिक मदत यावर नवदुर्गा युवा मंडळाचे सचिव अविनाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जोशी मॅडम यांनी आपल्या मनोगतात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, अमृत महोत्सवी वर्षानिम्मित गेले सप्ताह शाळेमध्ये राबवत असणारे विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम व त्या कार्यक्रमांना विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे लाभणारे सहकार्य यांचे कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींना नवदुर्गा युवा मंडळाकडुन गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करुन चित्रकला वही व कलर पेन्सिल बॉक्सचे वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलताना श्री. राजेंद्र कोलते यांनी प्रथमता भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, थोर महापुरुषांचे कार्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणुन काम करीत असताना शाळेतील शिक्षक वर्गाचा मिळाणारा प्रतिसाद व गावातील जेष्ठ मार्गदर्शक व युवा वर्गाचे लाभणारे सहकार्य यामुळेचं आज नवीन कुर्ली शाळेतील मुले विविध ठिकाणी होत असणा-या स्पर्धेमध्ये भाग घेवुन शाळेचं, गावाचं किंबहुना आपल्या परिवाराचं नाव उज्वल करीत आहेत याबाबत निश्चितचं कौतुक आहे. यापुढे देखिल गावामध्ये शाळेसंबंधी कोणेतेही काम किंवा समस्या असेल तर त्वरीत सोडण्यासाठी आपले गाव पातळीवर व प्रशासन पातळीवर प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. तसेच शाळेतील व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींना चित्रकला वही व कलर पेन्सिल बॉक्सचे वाटप केल्याबद्दल नवदुर्गा युवा मंडळाचे देखिल आभार व्यक्त केले. मंडळे तयार होतात पण काही काळाने त्याचे अस्तित्व अनेक कारणांनी संपुन जाते. पण नवदुर्गा युवा मंडळ यांस अपवाद असुन गेली २० वर्षे अविरतपणे सांस्कृतिक, सामाजिक किंबहुना शैक्षणिक कार्यक्रम राबवुन मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासुन गावाचा विकास साधतात याबद्दल नवीन कुर्ली गामविकास मंडळाचा अध्यक्ष म्हणुन समाधान वाटते.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये बहुंताशी सर्व मुलांनी भाग घेवुन काही मुलांनी मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषेमध्ये आपली मनोगते व्यक्त करुन स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती व नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कोलते, उपाध्यक्षा प्रिया दळवी, शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, तांबे मॅडम, वरवडेकर मॅडम, अंगणवाडी मुख्य सेविका कामतेकर मॅडम, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, उपाध्यक्ष दिपक शिंदे, सचिव अविनाश चव्हाण, मार्गदर्शक अरुण पिळणकर, मंगेश मडवी, गावातील जेष्ठ नागरीक आत्माराम तेली, शिवराम पोवार, शांताराम पार्टे, प्रकाश दळवी, दाजी मठकर, प्रसाद नांदगावकर, अंकुश दळवी, अमित दळवी, शिवराम पोवार,जनार्धन पोवार,शिवाजी होळकर,चंद्रकांत तेली, सचिन परब, शिवाजी चव्हाण,मुन्ना जाधव, अनिल दळवी, भाग्येश पोवार,भगवान तेली तसेच योगीता मडवी, आदिती दळवी आदी ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरवडेकर मॅडम तर आभार तांबे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वृंद, तसेच विद्यार्थी यांनी विशेष परिक्षम घेतले.

