*कोकण Express*
*उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान*
*देवगड ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक नेते शरद पवार यांच्या 80 वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना संक्रमण काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अत्यंत मोलाची कामगिरी बजाविलेल्या महसूल प्रशासनाचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मारुती कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक संजय कातीवले,तसेच ग्रामीण रुग्णालयात नायब तहसिलदार एस. व्ही. गवस, जि. के. सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वीटकर, डॉ मेहुल जाधव, डॉ सोनाली तेली तसेच डॉ अरुण गुमास्ते रापम सहा.वाहतूक निरीक्षक लवू सरवदे तसेच विजयदुर्ग आगार चालक वाहक यांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला तसेच जिलेबी वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी जेष्ठ नेते नंदकुमार घाटे, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, चंद्रकांत पाळेकर अभय बापट, उदय रुमडे, शरद शिंदे, बशीर शेख व अन्य उपस्थित होते.