*कोकण Express*
*युवाशक्तीचा उपयोग समाजाभिमुख कामासाठी व्हावा प्रा.डॉ. राजश्री साळुंखे*
*कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन कार्यक्रम संपन्न*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
राष्ट्रउभारीसाठी युवकांचा वाटा खुप मोठा आहे. ही युवाशक्ती योग्य ठिकाणी उपयोगात आली पाहिजे यातून समाजाला व व राष्ट्र उभारणीसाठी मोठे योगदान लाभेल. युवकांनी मानसिक व व्यक्तिमत्व विकासाकडे भर द्यावा. विद्यार्थी दशेत असताना वेळेचे महत्व समजुन घ्यावे. राष्ट्रीय सेवा योजना मार्फत युवकांना स्वतःसाठी व समाजासाठी कार्य करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. असे मत शि.प्र.मंडळ कणकवली चेअरमन प्रा.डॉ. राजश्री साळुंखे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.सुरेश पाटील, प्रा.विनया रासम, प्रा.सागर गावडे, प्रा.आदिती मालपेकर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, संस्कारक्षम पिढी तयार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग महत्वपूर्ण काम करत आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त अंगी बाळगून समाजासाठी कार्य करत रहावे. त्याबरोबरच आरोग्य ही महत्वपूर्ण बाब आहे. सर्वांनी आपले आरोग्य चांगले राखा. ज्या ठिकाण समाजासाठी काम करण्याची संधी मिळेल तिथे सहभाग घ्या व आपल्या आजुबाजुचा समाजातील प्रश्न समजून घ्या व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा.
या कार्यक्रम प्रसंगी प्रा. सुरेश पाटील यांनी सुत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर शेवटी प्रा. विनया रासम यांनी आभार मानले. उद्घाटन व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो स्वयंसेवक सेजल शेट्टी, संस्कृती चिंदरकर, ईश्वरी सोहनी, दीक्षांत पेडणेकर, प्रथमेश घाडी, प्रथमेश शिरसाट, अनुश्री कोयंडे, तेजस्विनी कोयंडे, अक्षता गुरव, हर्षदा कुबल, शरयू कदम, कस्तुरी पाताडे. यांनी राष्ट्रीय सेवा योजना सर्व कार्यक्रमाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यक्रमासाठी 160 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

