विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व नेतृत्व या सदगुणांना असणारे महत्व याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी इन्वेस्टीचर सेरिमनीची नितांत आवश्यकता आहे : सी.ई.ओ. राजेंद्र भोरे

विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व नेतृत्व या सदगुणांना असणारे महत्व याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी इन्वेस्टीचर सेरिमनीची नितांत आवश्यकता आहे : सी.ई.ओ. राजेंद्र भोरे

*कोकण Express*

*विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व नेतृत्व या सदगुणांना असणारे महत्व याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी इन्वेस्टीचर सेरिमनीची नितांत आवश्यकता आहे : सी.ई.ओ. राजेंद्र भोरे*

*कासार्डे;संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल येथे इन्वेस्टीचर सेरीमनी हा शालेय स्तरावरील अत्यंत महत्वाचा समारंभ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यान्वित करण्यात आलेल्या एका उपक्रमांतर्गत संपन्न झाला. विद्यार्थीदशेतच आगामी नेतृत्व , ठराविक भूमिका व जबाबदाऱ्या सोपवून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययनाचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी इन्वेस्टीचर सेरीमनी नितांत गरजेची आहे. शालेय जीवनात मिळालेल्या या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रबलता येईल व आगामी जीवनात संघ व्यवस्थापन कौशल्य व स्वयंशिस्त यांसारख्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे पार पाडू शकतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना त्यांच्या पदाची जबाबदारी व अधिकार शपथ विधीच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सरदार निकम यांनी सर्वाना शपथ दिली. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांच्याहस्ते बॅच व शाश प्रदान करून गौरविण्यात आले . विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व नेतृत्वाचे असणारे महत्व याची जाणीव व्हावी. या गुणांची आज युवा पिढीला नितांत गरज आहे अशी भावना विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व तालबद्ध रीतीने संचलन करून उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. या नयनरम्य संचलनाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र ठरले.

सदर प्रसंगी नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, खजिनदार परवेज पटेल , सचिव  मोहन कावळे आदी मान्यवर उपस्थित होते. दिमाखदार संचलन सादर करण्यासाठी क्रीडा शिक्षक तानाजी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे यथासांग निवेदन सोनाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!