विलास नावले यांची शिवसेना लोरे न. 2 विभागप्रमुखपदी नियुक्ती

विलास नावले यांची शिवसेना लोरे न. 2 विभागप्रमुखपदी नियुक्ती

*कोकण Express*

*विलास नावले यांची शिवसेना लोरे न. 2 विभागप्रमुखपदी नियुक्ती*

*खा. विनायक राऊत यांनी दिले नियुक्तीपत्र*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लोरे नं. 2 गावचे विद्यमान सरपंच विलास नावले यांची शिवसेना लोरे नं. 2 विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार विलास नावले यांच्या खांद्यावर शिवसेना विभागप्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. विलास नावले हे लोरे नं. 2 गावचे विद्यमान सरपंच आहेत.तसेच लोरे नं 2 जिल्हापरिषद मतदारसंघात त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे. प्रगतशील शेतकरी असलेले विलास नावले हे मृदुभाषी म्हणून दशक्रोशीत ओळखले जातात.विलास नावले यांना शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!