*कोकण Express*
*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तोंडवली-बावशी ग्रामपंचायतच्या वतीने उद्या विविध कार्यक्रम*
*ग्रामपंचायतीतर्फे कवी अजय कांडर, तोंडवली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वसंत सावंत, बँक कर्मचारी उद्धव कांडर, पोलीस पाटील विजय मोरये,समीर मयेकर आदींसह माजी सरपंच, उपसरपंच यांचा होणार गौरव*
*फोंडाघाट / प्रतिनिधी*
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी या गृप ग्रामपंचायतच्यावतीने सोमवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा.विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम,महीलांचे कार्यक्रम तसेच विविध मान्यवर मंडळींचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
या गौरवात तोंडवली बावशीचे सुपुत्र प्रसिद्ध कवी अजय कांडर, तोंडवली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वसंत सावंत, बावशी येथील बँक कर्मचारी उद्धव कांडर, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, बावशी पोलीस पाटील समीर मयेकर तसेच गृप ग्रामपंचायतचे माजी सरपंच व माजी उपसरपंच आदींचा समावेश आहे.
तसेच सकाळी कणकवली येथील वनरक्षक राजेन्द्र घुणकीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे तिनं दिवस घेण्यात आलेल्या मसाले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण यावेळी करण्यात येणार आहे.
असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे व ग्रामसेवक चव्हाण यांनी केले आहे.