शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन

*कोकण Express*

*शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन*

मुबंई, दि.१४ ऑगष्ट

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे.
आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या
गाडीला अपघात झाला. पुणे मुंबई एक्सप्रेस
हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली
इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज
मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते
मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात
झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.
उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक
मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज.
सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून
सोडणारे विनायक मेटे. मराठा समाजाला आरक्षण
मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे
विनायक मेटे…. मराठा समाजाच्या आंदोनांचा चेहरा.
अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र
हळहळला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!