*कोकण Express*
*केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट*
*भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत..!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचे स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळजी उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेचे, प्रवास मंत्री म्हणून सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ८ ऑगस्ट रोजी सकाळी ओम गणेश निवासस्थानी त्यांनी भेट दिली.त्यानंतर ते नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.