*कोकण Express*
*चिपी विमानतळावर 18 ऑगस्ट पासून अजून एक विमान फेरी सुरू!*
*आमदार नितेश राणे यांची माहिती*
*गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना लाभ घेण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्ग :*
चिपी विमानतळा वर 18 ऑगस्ट पासून दुसरे विमान सुरु करण्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. 18 ऑगस्ट पासून सायंकाळी 3 वाजता मुंबई हुन हे विमान सुटून 4.20 वा. ते विमान सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग होणार आहे. तर पुन्हा 4.45 ला टेक ऑफ घेत 6.20 वा. मुंबईला लँडिंग होणार आहे. गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ही एक सुवर्णसंधी देण्यात आली असून, चाकरमान्यांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा श्री राणे यांनी केले आहे. तूर्तास गणेशोत्सवासाठी ही नवीन विमान फेरी सुरू केली आहे. परंतु येत्या काळात ही विमान सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.