*हिम्मत असेल तर सतीश सावंत यांनी सोसायटी मतदार संघातून जिल्हा बँक लढवावी*
*भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी दिले आव्हान*
कणकवली ः प्रतिनिधी*हिम्मत असेल तर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सोसायटी मतदार संघातून सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेची निवडणूक लढवावी असे आव्हान भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी केले आहे. सांगवे सोसायटी च्या धान्य दुकानावर भिरवंडे येथील शिवसेनेचे गुंड तसेच कनेडी बाजारातील मोतेश खुनातील आरोपी बेनी डिसोझा व इतर आरोपी घेऊन टेम्पो ड्रायव्हरला धमकी देऊन गाडी ची चावी काढून घेत,गटसचिव व चेअरमन ला धमकी दिली.हे करण्या पेक्षा संचायनी घोटाळेबाज सतीश सावंत यांनी हिम्मत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक सोसायटी च्या मतदार संघातुन उभे रहावे मग तुमची जागा निश्चित च दाखवुन देऊ, तिथून पळ मात्र काढू नका असे सुरेश सावंत यांनी आव्हान दिले आहे.
सांगवें सोसायटीच्या मतदानाचा अधिकार सुरेश सावंत यांना दिल्या मुळे सिंधुदुर्ग बँक च्या निवडुकिती सतीश सावंत यांना आपला पराभव होणार हे नक्की कळले आहे असे सांगताना सुरेश सावंत म्हणाले सोसायटी चा मतदानाचा अधिकार बाद करण्याचा प्रयत्न खोटे आरोप करून सुरू आहे. परंतु न्याय देवतेने हे आरोप खोटे ठरविले.जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी कितीही खोटे करण्याचा प्रयत्न केला तरी या जगात न्याय देवता आहे. त्यामुळे संचायनी मधील गोर गरीब लोकांचा व शेतकऱ्यांना लुबाडून त्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्या सतीश सावंत यांना नियती माफ करणार नाही असा आरोपही सुरेश सावंत यांनी निवेदनात केला आहे.