वामनराव महाडीक विद्यालयाचे जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायनहू स्पर्धेत यश

वामनराव महाडीक विद्यालयाचे जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायनहू स्पर्धेत यश

*कोकण Express*

*वामनराव महाडीक विद्यालयाचे जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायनहू स्पर्धेत यश*

*कासार्डे;संजय भोसले*

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या वतीने “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त आयोजित ,*जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा 2022* मध्ये वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरेचे ६ वी ते ८वी आणि ९वी ते १२ वी हे दोन गट सहभागी झाले होते . या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून जवळपास गटवार एकूण ३६ ग्रूप सहभागी झाले होते. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली . यामध्ये तळेरे हायस्कूलच्या ६वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी या दोन्ही गटानीं *उत्तेजनार्थ पारितोषिक* प्राप्त केलीत . या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

*विद्यालयातील शिक्षक श्री.पी. एन.काणेकर* व *श्रीम. एन. पी.गावठे* यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी *प्राचार्य अविनाश मांजरेकर* यांचेही सहकार्य लाभले *विद्यालयातील ६ वी ते ८वी गटातून* समूह गीत गायनासाठी मयुरी संतोष तळेकर , श्रावणी संतोष लाड , अनुष्का समीर चव्हाण , आर्या अशोक भोगले , तन्वी गंगाराम राठोड , तन्मयी संदीप बंदरकर , मनस्वी मल्लिकार्जुन कळसनावर , निधी नितीन पांचाळ, मनस्वी रविंद्र बारस्कर , वेदीका संजय भोगले *तर ९ वी ते १२ गटातून* स्नेहल संतोष तळेकर , अनुष्का सुभाष घाडी , प्रियल प्रविण अमृते , चैताली प्रशांत तळेकर ,देवेन अनिल दुखंडे , रीया गंगाराम राठोड , प्रतिक्षा संतोष तांबे , आयुष सदानंद सुतार , सानिका सदानंद भोगले , गौरी बाळकृष्ण भोगले हे विद्यार्थी सहभागी झाले होते . *यादोन्ही गटानां अप्रतिम संगीत साथ* आर्या गणेश घाडी , तन्मय संतोष कदम , तक्षिल अमोल तळेकर , आशिष लक्ष्मण सुतार , आयुष मनोज तळेकर , पार्थ राघोबा भोगले या विद्यार्थ्यांनीं दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तळेरे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरुणकर , शरद वायंगणकर , संतोष तळेकर, संतोष जठार , निलेश सोरप , उमेश कदम , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक , ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांनीं अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!