*कोकण Express*
*विद्यार्थ्यांच्या आज पालकांचा मुलांशी संवाद आवश्यक* : स.पोलिस निरीक्षक भारत फार्णे*
*मुटाट प्रशालेत शिक्षक पालक संघाच्या सभेत प्रतिपादन*
*कासार्डे;संजय भोसले*
मुले घडवत असताना पालकांनी त्यांच्याशी संवाद नियमितपणे साधणे आवश्यक असल्याचे मत विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भारत फार्णे यांनी व्यक्त केले .
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल व कै. सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीच्या वेळी प्रमुख पाहुणे श्री. भारत फार्णे यांचा शाल ,श्रीफळ देऊन सभेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेला साठ वर्षे नुकतीच पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह देऊन श्री. सुभाषचंद्र परांजपे यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी श्री भारत फार्णे यांनी सध्या मुले मोबाईलच्या आहारी जात असून त्यांच्या करिअरची दिशा योग्य होण्याकरता पालकांनी प्रसंगी कठोर होऊन संवादाच्या माध्यमातून मुलांवर योग्य ते संस्कार करावेत असे आवाहन केले. पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी ,वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीने उपाध्यक्ष म्हणून समीर मुल्ला, वाघोटण यांची निवड केली. सभेस चांगली उपस्थिती होती. यावेळी बस धारक मुलांच्या समस्या ,विद्यार्थी प्रगतीबद्दल सकारात्मक चर्चा झाली. सभेच्या निमित्ताने संवादाचा कार्यक्रम उपयुक्त ठरला.
याप्रसंगी मुटाट च्या सरपंचा सौ. मानसी पुजारे मॅडम संस्था पदाधिकारी श्री .रघुनाथ पाळेकर, श्री भास्कर पाळेकर, सुरेश चिरपुटकर, विठोबा प्रभू ,दिलीप जोशी ,बाबाजी जोशी, शकील मुल्ला, श्री अमोल पाळेकर,सूर्यकांत साळुंखे सर , मुख्याध्यापक श्री घरपणकर,पोलीस श्री. गलोले श्री कदम साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घुगे सर यांनी केले .आभार श्री चेतन पाळेकर यांनी व्यक्त करून सभेची सांगता झाली.