सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी प्रा. वैभव साटम तर सहकार्यवाहपदी प्रा. प्रियदर्शनी पारकर

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी प्रा. वैभव साटम तर सहकार्यवाहपदी प्रा. प्रियदर्शनी पारकर

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी प्रा. वैभव साटम तर सहकार्यवाहपदी प्रा. प्रियदर्शनी पारकर*

*संघटनेच्या सभेमध्ये सर्वानुमते निवड*

*फोंडाघाट/प्रतिनिधी*

गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी कथा लेखक प्रा वैभव साटम (आयनल- मुंबई) तर सहकार्यवाहपदी शिरोडा येथील कवयित्री प्रा. प्रियदर्शनी पारकर यांची निवड करण्यात आली.
समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गची सभा संस्थेचे संस्थापक अजय कांडर आणि विद्यमान अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी प्रा. साटम, प्रा. पारकर यांची सदर निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा पाटील, संस्थेच्या खजिनदार प्रमिता तांबे, संस्थेचे सदस्य विजय सावंत आदी उपस्थित होते.
समाज साहित्य संघटना गेली काही वर्ष विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. गंभीरपणे लेखन करणाऱ्या कोकणातील लेखक- कवींना मंच उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्रातील गुणवान साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर स्मरणार्थ तसेच इतर पुरस्कार देऊ सन्मानित करणे आदी साहित्यिक उपक्रम राबवत आहे. अशा महत्त्वाच्या संस्थेच्या कार्यवाहपदी आणि सहकार्यवपदी अनुक्रमे प्रा. साटम आणि प्रा. पारकर यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्या चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रा. साटम हे गेली 20 वर्ष निष्ठेने कथा, कादंबरी, ललित, कविता, समीक्षा आदी साहित्य प्रकारात लेखन करत असून त्यांची विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत.मालवणी बोली भाषेचे एक अभ्यास अशीही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी ‘मालवणी बोलीतील कविता’ हा लिहिलेला ग्रंथ लक्षवेधी ठरला आहे. तर प्रा.पारकर या शिरोडा जुनिअर कॉलेज येथे इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून अध्यापन करतात. त्या निष्ठेने कविता लेखन करत असून त्यांच्या कवितांचा विविध प्रातिनिधिक कवितासंग्रहामध्ये समावेश करण्यात आला आहे. आपल्या या निवडीमुळे आपली साहित्य चळवळीतील जबाबदारी वाढली असल्याची भावना प्रा. साटम आणि प्रा.पारकर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!