युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ

*कोकण Express*

*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ*

*16 अॉगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 10.30 वा आर् पी डी हायस्कूल, सावंतवाडी येथे समारंभाचे आयोजन*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक 16 अॉगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 10.30 वा आर् पी डी हायस्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
मा आमदार श्री नितेशजी राणे साहेब ,मा श्री विकास सावंत, (माजी राज्यमंत्री ),मा श्री संजू परब, (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी) मा श्री प्रमोद कामत, (माजी शिक्षण सभापती) मा श्री गुरुनाथ पेडणेकर, (माजी शिक्षण सभापती),मा श्री रवी मडगावकर,
मा श्री महेश सारंग ,मा श्री. गजानन गावडे(सिंधुदुर्ग बॅंक संचालक),मा सौ रेश्मा सावंत, मा सौ शर्वणी गावकर, मा सौ श्वेता कोरगावकर, मा सौ उन्नती धुरी, मा सौ पल्लवी राऊळ, मा सौ उत्तम पांढरे (माजी जि प सदस्य )
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा रविवार दि. 27 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत जिल्हा भरातून ५२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 5 वे वर्ष होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली .
या परीक्षेतील प्रत्येक इयत्तेतील जिल्हास्तरीय पहिल्या 25 व आठही तालुक्यातील प्रत्येक इयत्तेतेतील पहिल्या 3 गुणवंत विद्यार्थ्यांना *2 लाख रुपयांची पारितोषिके, सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .6वी व 7 वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब* व ३/४ थी च्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क श्री सुशांत मर्गज (९४२०२०६३२६)
परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन *मा सौ संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग व मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान* यांनी केले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS 2023 ही परीक्षा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली असून फॉर्म वितरण सुरू करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!