*कोकण Express*
*वॉटर स्पोर्ट्स’ साठी खासदार राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी भेट घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून तशी मागणी केली.
जिल्ह्यातील जलक्रीडा व्यवसायावर हजारोच्या संख्येनं उपजीविका करणारे तरुण आहेत. आता खूप मोठ्या प्रमाणात देशातील पर्यटक कोकणात येत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांचं जलक्रीडा हे प्रमुख आकर्षण असल्यानं मागील दहा महिने कोरोनामुळे हे व्यवसाय बंद आहेत, ते अद्यापही सुरू झालेले नाहीत.परिणामी लाखो रुपयांची कर्ज घेऊन जलक्रीडा व्यवसाय चालविणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते न भरल्यानं बँका जप्तीच्या कारवाया करीत आहेत.’जलक्रीडा’ला मंजुरी मिळावी म्हणून मेरीटाईम कार्यालयानंख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असल्याचं समजत. सर्व नियमांचं पालन करून कोकणातील जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश आपण संबंधित जिल्हाधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.