*कोकण Express*
*दुधाळ गायी म्हैसींचे ब्रँडींगसेंटर जिल्ह्यातच होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.माजी आम.प्रमोद जठार*
*दुग्ध व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून बघीतले नसल्याने कोकण मागे*
*कासार्डे;संजय भोसले*
दुग्ध व्यवसाय ही चळवळ निर्माण झाले पाहीजे. तुम्ही जो व्यवसाय करता तो सात्यताने पैसा देणारा व्यवसाय आहे.दुग्ध व्यवसयाकडे व्यवसाय म्हणून बहीतले नसल्याने कोकण मागे आहे.सध्या जिल्हात गोकुळच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गोकुळ पश्चिम महाराष्ट्रात बारा लाख लिटार दूध गोळा करते तसे पुढील पाच वर्षात सिंधुदुर्ग व रत्नागिरी मिळून तेरा लाख दूध संकलन करूया.तसेच गोकुळ दुध, जिल्हा बँक,राज्य व केंद्रा सरकारच्या माध्यमातून सिंधुर्गात गायी,म्हेशी जिल्हातच मिळण्यासाठी ब्रँडिंग सेंटर झाले पाहीजे यासाठी गोकुळने पुढाकार घ्या यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करीने असे मार्गदर्शन सिंधुभूमी डेअरी फॉर्मचे संस्थपक तथा भाजपा प्रदेश चिटणीस, मा.आ.प्रमोद जठार यांनी केले. ते गोकुळ दुध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.बँक यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुधउत्पादक शेतक-यांसाठी आयोजित केलेल्या दुध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रम प्रशिक्षणात कासार्डे येथिल अभिषेक मंगल कार्यालयात ते बोलत होते.
या प्रशिक्षणाची सुरवात दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन मा.प्रमोद जठार याच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मुख्य मार्गदर्शक किल्लेदार डेअरी फार्मचे संचालक सागर किल्लेदार,सौ.वंदना किल्लेदार,गोकुळ दूध संघाचे डॉ.नितीन रेडकर,राजेश गावकर,संजय पाटील,योगेश खराटे, सिंधुभूमी डेअरी फॉर्मचे उध्दव शिंदे,संतोष हडकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जठार म्हणाले दूध व्यवसाय हा दारोदार दूध घेऊन विकत जावे लागते.आपण जो व्यवसाय करात तो समाजाला सुदृढ,ताकतवान व एक बलवान समाज निर्माण होतो.आपण करत असलेला व्यवसाय महत्त्वाचा आहे.आपल्या ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्याचे ज्ञान घेतले पाहीजे. जिल्हातील शेतक-यांची गायी म्हैशी घेताना फसवणूक होते. यासाठी ब्रँडिंग सेटर आवश्यक असून ते उभारण्यासाठी शासनाच्या सर्व योजनाच्या माध्यमतून उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.यातून आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हायाला दुग्धा व्यवासाय आणखिन वाढीस मदत होईल हा व्यवसाय हाताला पैसे देणारा आहे त्याचबरोबर प्रतिष्ठा व देश घडवणारा आहे असे सांगत या प्रशिक्षणानंतर सहभागी दुग्ध व्यवसायिक शेतकरी,मुख्य मार्गदर्शक व गोकुळ दुध संघानी मिळून यावर आधारित दुध विढीसाठी एकत्र आराखडा तयार करून शेतक-यांचे प्रश्न सोडवा असे सांगितले.
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून किल्लेदार डेअरी फार्म तिटवेचे संचालक मा.सागर किल्लेदार व सौ.वंदना किल्लेदार मॅडम या उच्च शिक्षित यशस्वी दुधउत्पादक दाम्पत्यानेया प्रशिक्षणात
जातीवंत दुधाळ जनावरांचे महत्त्व, जनावरांच्या चा-याचे नियोजन,गोठ्यातील व्यवस्थापन,गाभण तक्रार व माज ओळखणे,लसिकरनाचे महत्त्व, जंतनिर्मुलन,वासरे संगोपन आदि विषयावर सविस्तर मार्गदर्शन याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन दिले.त्याचबरोबरे जिल्हातील युवक दुग्ध व्यवसायात सक्रीय होत असल्याने भविषयात दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने ही बाब कौतुकाची असल्याचे सागर किल्लेदार यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन रेडकर यांनी करत सूत्रसंचलन व आभार यांनी मानले