सिधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी क्रिकेट प्रेमीना सुवर्णसंधी नोव्हेंबर 2022 मध्ये सावंतवाडीत होणार भंडारी चषक

सिधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी क्रिकेट प्रेमीना सुवर्णसंधी नोव्हेंबर 2022 मध्ये सावंतवाडीत होणार भंडारी चषक

* कोकण Express*

*सिधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी क्रिकेट प्रेमीना सुवर्णसंधी नोव्हेंबर 2022 मध्ये सावंतवाडीत होणार भंडारी चषक.*

*कणकवली येथील भंडारी महासंघाच्या जिल्हाबैठकीत एकमुखी ठराव, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांची माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे लक्ष्मीकांत मुडिये हॉल मध्ये दुपारी १२ वाजता पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

सदर सभेत प्रत्येक विषयांवर चर्चा करून सिंधुुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुुदुर्ग या भंडारी समाजाचा क्रिकेट संघ तयार करण्याचे ठरले आहे. त्या प्रमाणे प्रत्येक तालुक्याने समाजातील स्थानीक रहीवाशी असलेल्या खेळाडूमधून प्रत्येक तालुका संघ तयार करावा व सर्व तालुका संघातून उत्कृषठ खेळाडू काढून जिल्ह्याचा ऐक संघ तयार करणे असे ठरविण्यात आले.त्यासाठी जिल्हयातील सर्व भंडारी समाजाच्या क्रिकेट खेडावूना आवाहन करण्यात येते की प्रत्येक तालुक्याच्या मंडळाच्या कार्यालयान आपली नावे नोंद करावीत कारण येत्या ऑक्टोंबर २०२२ किंवा नोव्हेंबर २०२२ पर्यंत सावंतवाडी तालुक्यात सर्व तालुक्यातील स्पर्धा भरविण्यात येणार आहेत.तरी प्रत्येक तालक्यातील स्थानिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हाहन सिंधुुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच या सभेत वाडा – देवगड येथील पोलीस पाटील जयेंद्र शरदचंद्र मांजरेकर यांनी महसूल क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याब्दल त्यांचा महसूल विभागाने सन्मान केला आहे,त्यामुळे मांजरेकर यांचा भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच कणकवली तालुक्यात भंडारी महासंघाची प्रथमच सभा होत,असल्याने कणकवली तालुका अध्यक्ष श्री.भाईसाहेब काबंळी यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष श्री.रमण शंकर वायंगणकर यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.महासंघाचे सदस्य श्री.दिवाकर राजाराम मालवणकर- बांदा-सावंतवाडी यांनी या महासंघास फोरटेबल स्पीकर व माईक भेट म्हणून दिला. सभेत कार्याध्यक्ष श्री. हेमंत करणूरकर सरचिटणीस श्री विकास वैद्य. खजिनदार लक्ष्मीकांत मुंडये कणकवली तालुका अध्यक्ष श्री. भाईसाहेब कांबळी,जिल्हा सदस्य श्री मनोहर पालयेकर,जिल्हा सदस्य श्री. निलेश गोवेकर, श्री दिवाकर कर श्री. विलास करंजेकर श्री. उल्हास हलदणकर, श्री. शहद चोडणकर सौ मनाली करगुटकर इतर सर्व भंडारी समाज बांधव पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!