*कोकण Express*
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कणकवली महाविद्यालयात विविध कार्यक्रमास सुरुवात!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली कॉलेज कणकवली दिनांक ०९/०८/२२ रोजी महाविद्यालयाच्या पटांगणात सामूहिक राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी विचार मंचावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले , संस्थेचे चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे व पर्यवेक्षक प्रा. मंगलदास कांबळे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले यांनी 9 ऑगस्ट या दिनाचे महत्त्व विशद करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे यासाठीच ‘हर घर तिरंगा’ या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत हा सप्ताह सोहळा आयोजन करण्यात आला आहे त्याचा हा पहिला दिवस असून या क्रांती दिनाचे महत्त्व लक्षात घेता सामूहिक राष्ट्रगीत सादर करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात येत आहे. तर संस्थेचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे मॅडम विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना म्हणाल्या की,इग्रंजांना देशातून हद्दपार करण्यासाठी ‘छोडो भारत’ ,’करेंगे या मरेंगे’ ,’चले जावो’या चळवळी राबण्यात आल्या त्याचे स्मरण करण्यासाठी व दिडशे वर्षे इग्रंजांनी राज्य केले त्यांना देशातून हाकलून लावण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि शासनाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयांमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होणार आहेत. त्यापैकी आजच्या पहिल्यादिवशी सामूहिक राष्ट्रगीत गायन व शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होऊया असे त्यांनी आवाहन केले .या कार्यक्रमास डॉ.संदीप साळुंखे प्रा. राजेंद्र मुंबरकर लेफ्टनंट प्रा.डॉ.बाळू राठोड प्रा. सुरेश पाटील आदी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक ,एन सी .सी छात्रसेना .एन.एस.एस.विद्यार्थी, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.