आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली तालुक्यात चित्ररथ दौरा

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली तालुक्यात चित्ररथ दौरा

*कोकण Express*

*आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली तालुक्यात चित्ररथ दौरा*

*कणकवली पंचायत समितीचे आयोजन*

*तालुकावासियांनी सहभागी व्हा: गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समितीच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘ स्वराज्य महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे . त्यानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत तालुकाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीत चित्ररथ दौरा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली आहे ९ रोजी क्रांतीदिनानिमित्त कणकवली पं . स . येथे सामुहिक राष्ट्रगीत गायन स्पर्धा , करूळ येथील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे . १० रोजी कणकवली पंचायत समिती आवार व प्रत्येक ग्रा . पं . क्षेत्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे . १२ रोजी जि . प . प्राथमिक शाळा जानवलीसह वेगवेगळ्या ग्रा . पं . मध्ये फुगडी स्पर्धा व गोपाळांचा पंगत कार्यक्रम होणार आहे . १३ रोजी कणकवली पं . स . येथे ध्वजारोहण व वेशभुषा स्पर्धा तसेच कोळोशी ग्रामपंचायत येथे ‘ सेंद्रीय खताचे महत्व या विषयावर चर्चासत्र व कृषी मेळावा होणार आहे . १४ रोजी कणकवली पं . स . येथे ध्वजारोहण , पर्यावरण संवर्धन शपथ , प्रश्नमंजुषा स्पर्धा व प्रत्येक ग्रा . पं . मध्ये वृक्षारोपण होणार आहे . १५ रोजी कणकवली पं . स . येथे ध्वजारोहण तसेच पं . ते कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी प्रभातफेरी व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत . १६ रोजी प्रत्येक ग्रा पं . मध्ये शालेय स्पर्धा , किशोरी मेळावे , गीतगायन स्पर्धा होणार आहे . १७ रोजी स्वराज्य महोत्सवाने ‘ स्वराज्य महोत्सव २०२२ ची सांगता होणार आहे . स्वराज्य महोत्सव अंतर्गत चित्ररथ दौरा होणार आहे . त्याचा शुभारंभ ९ रोजी सकाळी १० वा . कणकवली पं . स . येथे होणार असून यादिवशी चिंचवली , खारेपाटण , नडगिवे , वायंगणी , कुरंगवणे , शेर्पे , शिडवणे , वारगांव , साळीस्ते , तळेरे , दारूम , ओझरम , कासार्डे , पियाळी , नांदगांव असा दौरा होणार आहे . १० रोजी तरंदळे , सावडाव , ओटव , माईण , भरणी आयनल , कोळोशी , असलदे , तोंडवली , बाघेरी , लोरे , घोणसरी , फोंडाघाट , करूळ , साकेडी , डामरे , तिवरे , कोंडये , ११ रोजी हरकुळ बुद्रुक , नागवे , करंजे , हरकुळ खुर्द , गांधीनगर , भिरवंडे , सांगवे , कुंभवडे , नाटळ , दारिस्ते , दिगवळे , नरडवे , जानवली , हुंबरट , बेळणे , १२ रोजी आशिये , कलमठ , वरवडे , पिसेकामते , बिडवाडी , कासरल , सातरल ओसरगांव , बोर्डवे , कळसुली , शिरवल , शिवडाव , हळवल , कसवण , बागदे असा चित्ररथ दौरा होणार आहे . सर्व कार्यक्रमांमध्ये तालुकावासीयांनी सहभागी व्हावे , असे आवाहन श्री . चव्हाण यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!